छत्रपती शिवाजी विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

बारामती, 9 मार्चः (प्रतिनिधी- शरद भगत) जगभरात 8 मार्च हा जागतिक महिला दिन साजरा करून महिलांबद्दल आदर व्यक्त करण्याचा दिवस असतो. या निमित्त बारामती तालुक्यातील मुर्टी येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, मुर्टी येथे 8 मार्च 2023 रोजी महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षा कवी शुभांगी जाधव या होत्या.

या प्रसंगी शुभांगी जाधव यांच्या माहेरची वाट व बैलगाडा या प्रसिद्ध कविता सादर केल्या. तसेच समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा व महिला शिक्षिकांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान केला. सदर कार्यक्रम मुख्याध्यापक काकडे सर व पर्यावेक्षक माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

आश्रम शाळेत वाढदिवस साजरा करत जपली सामाजिक बांधिलकी

या कार्यक्रमात महिलांचे आयुष्य कसे असते व महिला दिन साजरा का केला जातो याची माहीती मोनिका जगदाळे मॅडम यांनी दिली. मोरे मॅडम, जगदाळे मॅडम व विद्यार्थिनींनी महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सवची नूतन समिती गठीत

या कार्यक्रमासाठी देश सेवा करणारे नितीन औटे यांच्या मातोश्री, अलका तांबे, सुप्रिया राजपुरे, निता सावंत, निलम खोमणे, डॉ .लोंढे मॅडम, शुभांगी बनकर, पोलिस पाटील तृप्ती गदादे व मुर्टी गावातील महिला उपस्थित होत्या. यासह भाजपचे सरचिटणीस तथा पत्रकार बाळासाहेब बालगुडे व पत्रकार शरद भगत हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सारिका तांबे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन ठोंबरे मॅडम यांनी केले.

One Comment on “छत्रपती शिवाजी विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *