बारामती, 17 जानेवारीः बारामती तालुक्यातली उंडवडी सुपे येथे कृषि विभाग आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने 16 जानेवारी 2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस 2023 चे आयोजन करण्यात आले होते.
बारामतीत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे आयोजन
या कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण गावात प्रभात फेरी काढून तृणधान्याचे आहारातील महत्त्व सांगण्यात आले. जानेवारी महिना बाजरी पिकाला चालना देण्यासाठी उत्तम असल्याने बाजरी पासून बनवलेल्या पदार्थांच्या पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेत गृहिणींनी बाजरीचे बिस्कीट, नागदिवे, कापण्या, मलीदा, वरीचा भात व बाजरीचे डोसे असे रुचकर पदार्थ तयार केले. या उपक्रमात गावातील महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
या प्रसंगी मंडळ कृषि अधिकारी अरविंद यमगर यांनी तृणधान्याचे आहारातील महत्त्व सांगून दैनंदिन आहारात त्याचा समावेश करण्याचे आवाहन केले.
कऱ्हा नदीच्या पुलाचा पैसा पाण्यात!
या कार्यक्रमास मंडळ कृषि अधिकारी अरविंद यमगर, कृषि सहाय्यक माधुरी पवार, उद्धव चौधर, विजय गोपने, सोमनाथ वाघचौरे, उद्धव चौधर, ज्योती आडके, प्रणिता ननावरे आदी उपस्थित होते.
अनंत आशा इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
2 Comments on “उंडवडी सुपे येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य दिवसाचे आयोजन”