बारामती, 30 डिसेंबरः महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांअंतर्गत बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे होणाऱ्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन उत्कृष्टरित्या करावे, अशा सूचना प्रतिपादन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिल्या.
विद्या प्रतिष्ठान येथे 5 ते 8 जानेवारी 2023 या कालावधीत महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांअंतर्गत कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रांत कार्यालयात या स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत आज, 30 डिसेंबर 2022 रोजी उप विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, मुख्याधिकारी महेश रोकडे, बारामतीचे तालुका क्रीडा अधिकारी अनिल सातव, इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी गीता साखरे, दौंडचे तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य, क्रीडा शिक्षक, विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या दोन गटात फ्री स्टाईलने तुफान राडा
प्रांताधिकारी कांबळे म्हणाले की, बारामतीत ही स्पर्धा होत आहे, ही शहराच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. सर्व विभागांनी स्पर्धा चांगल्या रीतीने पार पाडण्यासाठी समन्वयाने कामे करावीत. स्पर्धेसाठी राज्यभरातून येणाऱ्या खेळाडूंना उत्तम सोई-सुविधा उपलब्ध करुन द्यावात. कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची सर्वच विभागांनी दक्षता घ्यावी. पुणे विभागातील क्रीडा ज्योत बारामतीहून निघणार असून क्रीडा ज्योत रॅलीचे नेटके नियोजन करावे. शाळेतील विद्यार्थ्यांना, खेळाडूंना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
वंचितची बारामती शहर व तालुका कार्यकारणी मुलाखती संपन्न
स्पर्धेच्या निमित्ताने बारामती शहरातील नागरिकांना राज्यातील नामवंत खेळाडूंचे खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धा पाहण्यासाठी बारामती शहरासह तालुक्यातील शाळांना सहभागी करून घ्यावे, असेही कांबळे म्हणाले.
जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी माहिती दिली की, या स्पर्धेत राज्यातील पुरुष व महिला गटात प्रत्येकी 8 वरिष्ठ संघ सहभागी होणार असून खेळाडूंसोबत संघव्यवस्थापक, मार्गदर्शक, तांत्रिक अधिकारी व स्वयंसेवक असे सुमारे 300 व्यक्ती सहभागी होणार आहेत.
One Comment on “राज्य ऑलिम्पिक कबड्डी स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या सूचना”