बारामती, 2 सप्टेंबरः बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील सिरसाई रेल्वे स्थानकाला आज, 2 सप्टेंबर 2022 रोजी मंडल रेल प्रबंधक कार्यालयाच्या वतीने आयओडब्ल्यू नरसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेल्या पथशिकाने पाहणी केली.
बारामतीत पुन्हा हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन
या पाहणी दरम्यान, रेल्वे अधिकाऱ्यांनी स्थानकाच्या प्लॅट फॉर्मची उंची वाढविण्यासंबंधी सूचना दिल्या. तसेच रेल्वे पुलाखालून जाणारा रस्ता खराब झाला आहे. सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यासंदर्भात सूचना दिल्या. तसेच दुरुस्ती अहवाल तयार करुन तत्काळ दुरुस्ती करण्यात येईल, असे सांगितले. रस्त्यासंदर्भात मंडल रेल प्रबंधक कार्यालयाच्या नावे अर्ज करा, अर्ज मिळताच एनओसी लगेच पाठवुन देतो आणि लगेच ग्रामपंचायतीने कामास सुरुवात करावी, असे नरसिंग यादव यांनी यावेळी सांगितले.
तसेच ग्रामपंचायतीच्या मागणी नुसार सिरसाई स्थानकासह कटफळ आणि मळद या तिन्ही प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात येईल, आशी माहिती ज्ञानेश्वर खरात आणि खाडे यांनी दिली. यावेळी रेल्वेचे संबंधित अधिकाऱ्यांसह सरपंच आप्पासाहेब आटोळे, सदस्य विश्वास आटोळे, दत्तात्रय शिंदे, रमेश हिवरकर, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय लोणकर, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
पुणे विभागात बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती अव्वल