नेपाळ, 23 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरात एक प्रवासी बस 150 मीटर खोल मर्स्यांगडी नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात 14 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघातावेळी या बस मध्ये 43 प्रवासी होते. या बसमधील प्रवासी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच नेपाळ पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी शोध आणि बचाव कार्य सुरू केले. दरम्यान, ही बस पोखराहून काठमांडूला जात होती. त्यावेळी हा अपघात झाला.
https://x.com/IndiaInNepal/status/1826900086141415478?s=19
हे सर्व प्रवासी जळगाव जिल्ह्यातील
दरम्यान, या बसमधील सर्व 43 प्रवासी हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक समोर आली आहे. हे सर्वजण काठमांडू येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्यावेळी ही बस नदीत कोसळली. दुर्दैवाने त्यातील 14 जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर अन्य जखमींवर सध्या तातडीने उपचार केले जात आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1826913392101147043?s=19
देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट
या घटनेबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींना लवकर आराम पडावा, अशी प्रार्थना करतो. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. प्रारंभिक माहितीनुसार, हे भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याचे कळते आहे. राज्य सरकारने तत्काळ नेपाळ दुतावासाशी संपर्क साधला असून, जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकार्यांशी सातत्याने संपर्कात आहेत. एक प्रांत आणि पोलिस उपअधीक्षक ते सोबत देत असून नेपाळ सीमेवर ते जाणार आहेत. जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा देणे, यासाठी आपले अधिकारी सातत्याने संपर्कात आहेत. नेपाळ सरकारशी समन्वय साधून मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तरप्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत. महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, स्वत: मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हे सुद्धा सातत्याने संपर्कात आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.