संगमनेर, 23 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. इंदोरीकर महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी इंदोरीकर महाराजांना संगमनेर प्रथम वर्ग न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. इंदोरीकर महाराजांनी अपत्य जन्मासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यावर आज संगमनेर कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने इंदोरीकर महाराजांना जामीन मंजूर केला.
तर इंदोरीकर महाराज यांनी 3 वर्षांपूर्वी त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमात अपत्य प्राप्ती संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते, असे इंदोरीकर महाराजांनी त्यावेळी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराज यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. तेंव्हापासून संगमनेर प्रथम वर्ग न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी होत आहे.
डीपफेक संदर्भात केंद्र सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत
दरम्यान इंदोरीकर महाराज यांच्या जामीन अर्जावर उद्या (24 नोव्हेंबर) सुनावणी होणार होती. मात्र इंदोरीकर महाराज यांचा उद्या कीर्तन दौरा असल्यामुळे ते आजच्याच दिवशी संगमनेर कोर्टात हजर झाले होते. त्यावेळी इंदोरीकर महाराजांच्या वतीने कोर्टाला जामीन अर्जावर आजच सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली. यावेळी कोर्टाने इंदोरीकर महाराजांची ही विनंती मान्य केली आणि त्यांना 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यामुळे इंदोरीकर महाराज यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विधानसभा अध्यक्ष सुनावणी लांबवत आहेत, ठाकरे गटाचा आरोप
One Comment on “इंदोरीकर महाराजांना कोर्टाचा दिलासा”