गयाना, 28 जून: (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना झाला. गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडचा 68 धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर भारतीय संघाने टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. 29 जून रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात आता भारताची लढत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
https://x.com/JayShah/status/1806428198546329660?s=19
https://x.com/ICC/status/1806418282909479208?s=19
https://x.com/ICC/status/1806421546858139936?s=19
https://x.com/BCCI/status/1806421551165940192?s=19
इंग्लंडचा 103 धावांत धुव्वा!
तत्पूर्वी, उपांत्य फेरीच्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यावेळी भारतीय संघाने 20 षटकांत 7 बाद 171 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ 16.4 षटकांत 103 धावांवर बाद झाला. यामध्ये हॅरी ब्रूक याने सर्वाधिक 25 धावा केल्या. तर जोस बटलर 23 धावांची खेळी करून बाद झाला. त्याचवेळी इंग्लडच्या इतर कोणत्याही फलंदाजाला फार काही करता आले नाही. या सामन्यात भारताकडून अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने 2 विकेट घेतल्या. तसेच इंग्लंडचे दोन फलंदाज धावबाद झाले.
https://x.com/ICC/status/1806386011997417956?s=19
रोहित शर्माचे शानदार अर्धशतक
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताचा सलामीवीर विराट कोहली आणि रिषभ पंत हे अनुक्रमे 9 आणि 4 धावा करून बाद झाले. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी संघाचा डाव सावरला. या सामन्यात रोहित शर्माने 39 चेंडूत सर्वाधिक 57 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तसेच सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत 47 धावा केल्या. त्यानंतर हार्दिक पांड्या 13 चेंडूत 23 धावा, रविंद्र जडेजा 9 चेंडू 17 धावा आणि अक्षर पटेलने 6 चेंडूत 10 धावा केल्यामुळे भारताला इंग्लंडसमोर 172 धावांचे लक्ष्य ठेवता आले. या सामन्यात इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने 3, तर रिस टोपले, जोफ्रा आर्चर, सॅम करन आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.