वर्ल्डकपमध्ये आज भारत विरुद्ध नेदरलँड्स सामना

बंगळुरू, 12 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) विश्वचषक स्पर्धेत आज भारत विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात सामना होणार आहे. विश्वचषक स्पर्धेतील हा शेवटचा सामना आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना दुपारी 2 वाजता खेळविण्यात येणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भारताने त्यांचे सकाळी फेरीतील सर्वच्या सर्व 8 सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. तर दुसरीकडे नेदरलँड्स संघ गुणतालिकेत 10 व्या स्थानी आहे. त्यामुळे उपांत्य फेरीपूर्वीचा साखळी सामना जिंकण्याचा प्रयत्न भारतीय संघ करणार आहे.

यंदा मी दिवाळी साजरी करणार नाही – जरांगे पाटील

भारत आणि नेदरलँड्स यांच्यात आतापर्यंत 2 सामने झाले आहेत. या दोन्ही सामन्यांत भारताने नेदरलँड्सचा पराभव केला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून विजयाची हॅट्ट्रिक साधण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. तसेच यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताचे फलंदाज आणि गोलंदाज जबरदस्त फॉर्मात आहेत. त्यामुळे भारतीय संघासाठी आजचा सामना सोपा जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आजचा सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. चिन्नास्वामीची खेळपट्टी ही कायमच फलंदाजीसाठी उपयुक्त मानली जाते. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघाची प्रथम फलंदाजी आल्यास मोठी धावसंख्या होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे गोलंदाजांना मात्र या खेळपट्टीवर मदत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.

शिवसेनेच्या शाखेचा वाद आता कोर्टात रंगणार

आजच्या सामन्यात पावसाची शक्यता नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शंका नाही. तत्पूर्वी, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे 4 संघ खेळणार आहेत. यामध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी, तर ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

One Comment on “वर्ल्डकपमध्ये आज भारत विरुद्ध नेदरलँड्स सामना”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *