इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; मोहम्मद शमीचे पुनरागमन

भारतीय संघाची इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी घोषणा

दिल्ली, 11 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीने इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून 5 टी-20 क्रिकेट सामन्यांची मालिका खेळविण्यात येणार आहे. या टी-20 मालिकेसाठी पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे, तर अक्षर पटेलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

https://x.com/BCCI/status/1878093144673468596?t=8PWH9UXRQu6K2kw12mj1dw&s=19

मोहम्मद शमीचे पुनरागमन!

विशेष बाब म्हणजे, या मालिकेसाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 34 वर्षीय शमी घोट्याच्या दुखापतीमुळे 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलपासून भारताच्या राष्ट्रीय संघाबाहेर आहे, यादरम्यान त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. मोहम्मद शमी अलिकडेच सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी या देशांतर्गत स्पर्धांमध्ये बंगालच्या संघाकडून खेळला होता. या कालावधीत त्याने आपण फिट असल्याचे सिद्ध केले होते.

सामन्यांचे वेळापत्रक:

इंग्लंड विरुद्धच्या या 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 22 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता कोलकाता येथे खेळविला जाईल. दुसरा सामना 25 जानेवारी रोजी चेन्नई, तिसरा सामना 28 जानेवारी जानेवारी रोजी राजकोट, चौथा सामना 31 जानेवारी रोजी पुणे, पाचवा आणि शेवटचा सामना 2 फेब्रुवारी रोजी मुंबईत खेळविण्यात येणार आहे. हे सर्व सामने देखील सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहेत.

https://x.com/BCCI/status/1878098426203967800?t=S0RuVG1i2Kt5HTME5We43Q&s=19

भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (विकेटकीपर), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरूण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल (विकेटकीपर).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *