न्युझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

दिल्ली, 12 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारत विरूद्ध न्युझीलंड यांच्यातील आगामी तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार जसप्रीत बुमराम असणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात 15 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. भारत आणि न्युझीलंड यांच्यातील ही कसोटी मालिका येत्या 16 ऑक्टोंबरपासून खेळविण्यात येणार आहे. या मालिकेतील सामने भारतातच होणार आहेत. दरम्यान, ही कसोटी मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असणार आहे. कारण, त्यामुळे टीम इंडिया जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलसाठी आपले स्थान आणखी मजबूत करू शकेल.

https://x.com/BCCI/status/1844791143168364782?t=BnR4rg56Ctig8dcBmLOLbA&s=19

बांगलादेशला क्लीन स्वीप दिली होती

निवड समितीने न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ निवडला आहे. दिवसांपूर्वी भारत आणि बांगलादेश यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळविण्यात आली होती. या मालिकेत निवडण्यात आलेला भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी कायम ठेवण्यात आला आहे. या भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धची 2 सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली होती. या संघात अनुभवी खेळाडूंसोबतच नवीन खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाचा सामना करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.

सामन्यांचे वेळापत्रक…

तत्पूर्वी, ही कसोटी मालिका भारतातच खेळविण्यात येणार आहे. यातील पहिला सामना 16 ते 20 ऑक्टोंबर रोजी बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आला आहे. दुसरा सामना 24 ते 28 ऑक्टोंबर रोजी पुण्यात आणि तिसरा कसोटी सामना 01 ते 05 नोव्हेंबर रोजी मुंबईत खेळविण्यात येणार आहे. हे तिन्ही सामने सकाळी 9.30 वाजल्यापासून सुरू होणार आहेत. या सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स18 चॅनल आणि जिओ सिनेमा या ओटीटी ॲप्सवर पाहता येतील.

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, रिषभ पंत (विकेटकिपर), ध्रुव जुरेल (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.
राखीव खेळाडू: हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, मयंक यादव आणि प्रसीध कृष्णा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *