धर्मशाळा, 22 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात धर्मशाळा क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळविण्यात येत आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. तर या सामन्यात न्यूझीलंडने 50 षटकांत सर्वबाद 273 धावा केल्या. यामध्ये डॅरिल मिशेलने 127 चेंडूत 130 धावा करत जबरदस्त खेळी खेळली. मिचेलचे हे पाचवे एकदिवसीय शतक आहे. त्याला रचिन रवींद्र याने 75 धावा करीत चांगली साथ दिली.
फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे – सुप्रिया सुळे
या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे न्यूझीलंडला 273 धावांमध्ये रोखण्यात यश आले. भारताकडून मोहम्मद शमीने या विश्वचषकातील आपल्या पहिल्या सामन्यात 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला. तत्पूर्वी, कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताचा पाठलाग करणारा हा सलग पाचवा सामना ठरला. त्यानंतर मोहम्मद सिराजला लगेचच डेव्हन कॉनवेची मोठी विकेट लवकर मिळाली.
गरबा खेळताना 24 तासांत 10 मृत्यूची नोंद
खेळण्यासाठी आलेल्या रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांनी फिरकी गोलंदाजांवर हल्ला चढवत भारतीय गोलंदाजांवर दबाव आणला. मात्र अखेर रचिन रवींद्र हा 75 धावांवर शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर न्यूझीलंडच्या धावगतीला काहीसा ब्रेक लागला. दरम्यान, भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा दुखापतीमुळे आजच्या सामन्यात खेळला नाही. त्यामुळे भारतीय संघात सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी या खेळाडूंना संधी मिळाली. तर शार्दुल ठाकूर याला आजच्या सामन्यात बाहेर बसावे लागले आहे.
One Comment on “भारताने न्यूझीलंडला 273 धावांत रोखले”