भारत-इंग्लंड चौथा कसोटी सामना: दुसऱ्या दिवसाअखेर भारत 7 बाद 219 धावा

रांची, 24 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ आज समाप्त झाला. यावेळी भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाअखेर 7 बाद 219 धावा केल्या आहेत. भारतीय संघ सध्या 134 धावांनी मागे आहे. भारताचे ध्रुव जुरेल (30) आणि कुलदीप यादव (17) हे सध्या फलंदाजी करीत आहेत. तर या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघ सध्या अडचणीत आला आहे.

https://twitter.com/BCCI/status/1761348113955213697?s=19

इंग्लंडच्या पहिल्या डावात 353 धावा

दरम्यान, या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडने 353 धावा केल्या आहेत. यामध्ये इंग्लंडकडून जो रूट याने सर्वाधिक नाबाद 122 धावांची खेळी केली. सोबतच ऑली रॉबिन्सनने 58 धावा केल्या. तसेच जॅक क्रॉलीने 42 चेंडूत 42 धावा आणि जॉनी बेअरस्टो याने 35 चेंडूत 38 धावांची खेळी केली. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर आकाश दीपने 3, मोहम्मद सिराजने 2 आणि रविचंद्रन अश्विनने 1 विकेट घेतली.

यशस्वी जैस्वालचे शानदार अर्धशतक

त्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या भारतीय संघाच्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली. भारताचा कर्णधार रोहित शर्मा 2 धावा करून बाद झाला. त्याला जेम्स अँडरसनने बाद केले. त्यानंतर यशस्वी जैस्वालने एका बाजूने चांगली फलंदाजी केली. त्याने या सामन्याच्या पहिल्या डावात 73 धावांची खेळी केली. मात्र तो शोएब बशीरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच्या व्यतिरिक्त शुभमन गिल 38, रजत पाटीदार 17, रवींद्र जडेजा 12, सरफराज खान 14 हे फलंदाज लवकर बाद झाले.

भारत सध्या 134 धावांनी मागे

त्यामुळे या सामन्याच्या पहिल्या डावात भारताची धावसंख्या आतापर्यंत 7 बाद 219 इतकी झाली आहे. त्यामुळे भारतीय संघ अद्याप 134 धावांनी मागे आहे. तर सध्या भारताचे ध्रुव जुरेल 30 आणि कुलदीप यादव 17 धावांवर खेळत आहेत. पहिल्या डावात इंग्लंडकडून शोएब बशीर याने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर टॉम हार्टली 2 आणि जेम्स अँडरसन याने 1 विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *