पहिल्या टी-20 सामन्यात भारताने केला श्रीलंकेचा 43 धावांनी पराभव!

पल्लेकेले, 27 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना शनिवारी झाला. श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेवर 43 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 214 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य पार करताना श्रीलंकेचा संघ 19.2 षटकांत 170 धावांत सर्वबाद झाला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवचा हा 16 वा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. त्याने या बाबतीत विराट कोहलीची बरोबरी केली आहे.

https://x.com/BCCI/status/1817250222051098904?s=19

https://x.com/BCCI/status/1817251572218536061?s=19

सूर्यकुमार यादवचे अर्धशतक!

तत्पूर्वी, या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारताच्या डावाची सुरूवात केली. त्यावेळी दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी झाली. संघाची 74 धावसंख्या असताना शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल अनुक्रमे 34 आणि 40 धावा करून बाद झाले. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी केली. त्याने आपले अर्धशतक 22 चेंडूत पूर्ण केले. परंतु सूर्यकुमार यादव 58 धावा करून बाद झाला. त्यानंतर रिषभ पंतने 33 चेंडूत 49 धावांची खेळी केली. तसेच अक्षर पटेलने 5 चेंडूत नाबाद 10 धावा केल्या. त्यामुळे भारताला श्रीलंकेसमोर 214 धावांचे लक्ष्य ठेवता आले. या सामन्यात श्रीलंकेकडून मथिसा पाथिरानाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर मधुशंका आणि हसरंगा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

पथुम निसांकाची 79 धावांनी खेळी

प्रत्युत्तरात खेळताना श्रीलंकेच्या डावाची देखील चांगली सुरूवात झाली. या सामन्यात पथुम निसांका आणि कुसल मेंडिस या दोघांनी 84 धावांची सलामी दिली. त्यावेळी कुसल मेंडिस 45 धावा करून बाद झाला. त्यानंतर या सामन्यात निसांकाने एका बाजूने चांगली फलंदाजी केली. त्याने या सामन्यात 48 चेंडूत 79 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर निसांका बाद झाल्यानंतर कुसल परेरा 20 धावा आणि मेंडिसने 12 धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेच्या इतर फलंदाजांना फार काही करता आले नाही. श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. परिणामी, श्रीलंकेचा संघ हा सामना 43 धावांनी हरला. या सामन्यात भारताकडून या सामन्यात रियान परागने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 आणि मोहम्मद सिराज आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी एक विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *