भारत बनला सर्वाधिक विजय मिळवणारा संघ!

रायपूर, 02 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय क्रिकेट संघाने रायपूर येथे खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव केला होता. या विजयासह भारताने ही मालिका 3-1 अशी जिंकली आहे. भारतीय संघाचा हा 136 वा विजय होता. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघाने एक विक्रमही आपल्या नावावर केला आहे. त्यानूसार भारत हा आता टी-20 प्रकारात सर्वाधिक विजय मिळवणारा संघ बनला आहे. याबाबतीत भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे.

जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान मोदी यांचा सेल्फी व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत 213 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 136 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर 67 सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला आहे. तसेच टी-20 मध्ये सध्या भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाची टक्केवारी 63.84 इतकी आहे. दरम्यान भारत 1 डिसेंबर 2006 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळला खेळला होता. त्यानंतर 2007 मध्ये झालेल्या पहिल्या टी-20 विश्वचषकात भारताने विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघ टी-20 मध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करताना दिसत आहे.

डीपफेक समाजासाठी धोकादायक; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे विधान

भारतीय संघाने सध्या टी-20 मध्ये सर्वाधिक 136 सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यापाठोपाठ पाकिस्तानने 135, न्यूझीलंड 102, ऑस्ट्रेलिया 95 आणि दक्षिण आफ्रिकेने 95, इंग्लंड 92, श्रीलंका 79, वेस्ट इंडिज 76, अफगाणिस्तान 74, आयर्लंड 64, बांगलादेश 58 आणि झिम्बाब्वेने 44 टी-20 सामन्यांत विजय मिळवला आहे. तत्पूर्वी भारतीय संघाने आता पाकिस्तानला मागे टाकत टी-20 मध्ये सर्वाधिक विजय मिळवले असल्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते संघाचे कौतुक करताना दिसत आहेत.

One Comment on “भारत बनला सर्वाधिक विजय मिळवणारा संघ!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *