मुंबई, 02 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात भारताने श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात भारताने श्रीलंकेसामोर विजयासाठी 358 धावांचे आव्हान ठेवले होते. तर प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 19.5 षटकांत 55 धावाच करू शकला. या विजयामुळे भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. दरम्यान या स्पर्धेतील भारताचा हा सलग सातवा विजय आहे. तर या पराभवामुळे श्रीलंकेचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
मुर्टी गावात राजकीय नेत्यांना गाव बंदी!
https://twitter.com/cricketworldcup/status/1720097183163187640?s=1
तत्पूर्वी, या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. यावेळी भारतीय संघाच्या डावाची खराब सुरुवात झाली. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर कर्णधार रोहित शर्मा 4 धावांवर बाद झाला. त्याला मदुशंकाने बाद केले. त्यानंतर विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी केली. मात्र, या दोघांना देखील आपले शतक पूर्ण करता आले नाही. यावेळी शुभमन गिल 92 धावांवर बाद झाला. त्यामुळे त्याचे शतक केवळ 8 धावांनी हुकले. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर विराट कोहली ही 88 धावांवर बाद झाला. विराटने त्याच्या खेळीत 11 चौकार लगावले. यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या दोघांनी 46 चेंडूत 60 धावांची भागीदारी केली. मात्र, लगेचच राहुल 19 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव ही 12 धावा करून बाद झाला. यादरम्यान श्रेयस अय्यरने एकदिवसीय कारकिर्दीतील 16 वे अर्धशतक झळकावले. श्रेयस अय्यर 56 चेंडूत 82 धावा करून बाद झाला. श्रेयसने त्याच्या या खेळीत 3 चौकार आणि 6 षटकार लगावले. मग आलेल्या रविंद्र जडेजाने 24 चेंडूत 35 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला श्रीलंकेसमोर 358 धावांचे बलाढ्य लक्ष्य ठेवता आले. तर श्रीलंकेतर्फे मधुशंकाने 5 आणि चमीराने 1 विकेट घेतली.
तर प्रत्युत्तरात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेला पहिल्याच चेंडूवर पहिला धक्का बसला. त्यांचा सलामीवीर पथुम निसांका हा बुमराहच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर सिराजने पुढच्याच षटकात दिमुथ करुणारत्ने आणि सदिरा समरविक्रमालाही बाद केले. कर्णधार मेंडिस देखील त्याच्याच गोलंदाजीवर 1 धाव काढून बाद झाला. त्यानंतर मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. मोहम्मद शमीने या सामन्यात देखील 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला. शमीने या विश्वचषक स्पर्धेत दोनदा 5 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. याच कामगिरीमुळे शमीला आजच्या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला आहे. तर या सामन्यात श्रीलंकेच्या 8 फलंदाजांना दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही. श्रीलंकेतर्फे रजिताने सर्वाधिक 14 धावांची खेळी केली. तर भारताकडून मोहम्मद शमी 5, मोहम्मद सिराज 3, बुमराह आणि जडेजा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
मराठा आंदोलनाविरोधात सदावर्तेंची कोर्टात धाव
One Comment on “भारताचा श्रीलंकेवर 302 धावांनी विजय”