रायपूर, 01 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना आज झाला. रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 20 धावांनी विजय मिळवला आहे. त्याचबरोबर भारताने ही मालिका 3-1 अशी जिंकली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर 175 धावांचे आव्हान ठेवले होते. तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 7 बाद 154 धावाच करू शकला.
आमच्यावरील गुन्हे तातडीने मागे घ्या – जरांगे पाटील
तत्पूर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 9 गडी गमावून 174 धावा केल्या होत्या. भारताकडून रिंकू सिंगने सर्वाधिक 46 धावा केल्या. तर यशस्वी जैस्वाल 37 आणि जितेश शर्माने 35 धावांची खेळी केली. तसेच ऋतुराज गायकवाड 32 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून बेन डॉरिसने तीन तर तनवीर संघा, जेसन बेहरेनडॉर्फ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अॅरॉन हार्डीला 1 विकेट मिळाली. दरम्यान या सामन्यात भारतीय संघाला 200 धावा करण्याची संधी होती. मात्र, शेवटच्या 2 षटकांत भारताच्या 13 धावांत 5 विकेट पडल्या. त्यामुळे भारताला 174 धावांवरच समाधान मानावे लागले.
तर प्रत्युत्तरात खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरूवात चांगली झाली. या सामन्यात त्यांच्या ट्रॅव्हिस हेड आणि जोश जोश फिलिप या सलामीवीरांनी 40 धावांची सलामी दिली. यामध्ये ट्रॅव्हिस हेड 16 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. तर जोश फिलिपने 7 चेंडूत 8 धावा केल्या. त्यानंतर अॅरॉन हार्डी 8, टीम डेव्हिड 19, बेन मॅकडरमॉट 19, मॅथ्यू शॉर्ट 22 हे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. त्यानंतर कर्णधार मॅथ्यू वेड याने 23 चेंडूत नाबाद 36 धावांची खेळी केली. मात्र त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 3 आणि दीपक चाहरने 2 विकेट घेतल्या. तर रवि बिश्नोई आणि आवेश खान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. अक्षर पटेलला या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ प्रकरण; ठाकरे गटाच्या नेत्याला जामीन मंजूर
One Comment on “चौथ्या टी-20 सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 20 धावांनी विजय”