इंदापूर/ निरगुडे, 29 फेब्रुवारीः (सम्राट गायकवाड) इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथील शेतकऱ्यांचे पिक विमा तसेच शेतकऱ्यांच्या पिकाची झालेल्या नुकसानीबाबत तात्काळ पंचनामे होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम वर्ग करावी, यासाठी निरगुडे गावातील शेतकरी भगवान (बापू) खारतोडे यांनी 10 जानेवारी 2024 पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा विषय शिकवणे सक्तीचे! राज्य सरकारचा मोठा निर्णय
इंदापूर तालुक्यातील निरगुडे गावातील तलाठी कार्यालय, निरगुडे यांच्या समोर उपोषण सुरू आहे. या उपोषणास विविध संघटनांनी जाहीर पाठिंबा दिल्याचे सांगण्यात आले आहे. या उपोषणाला अनेक शेतकऱ्याचे पाठिंबा दर्शवला आहे.
जो पर्यंत मागण्या संबंधित प्रशासन व विमा कंपनी यांच्याकडून पूर्ण होत नाही, तो पर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे उपोषणकर्ते भगवान खारतोडे यांनी ‘भारतीय नायक’शी बोलताना सांगितले आहे.
बीसीसीआय कडून खेळाडूंचा वार्षिक करार जाहीर! श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना बाहेरचा रस्ता