बारामती, 8 जानेवारीः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील मोढवे गावच्या हद्दीमध्ये यशवंतराव मोरे पाटील आश्रम शाळेजवळ हिरा मोरगाव रोडच्या पश्चिमेला असलेल्या विद्युत खांबाला काही दिवसांपुर्वी एका अज्ञात वाहनाने धडक दिली. यामुळे सदर विद्युत खांबाचे नुकसान होऊन विद्युत खांबावरील तारा शेतामध्ये लोंबकळत आहेत.
विधान भवनात पत्रकारांची बाजू मांडणारः नाना पटोले
गेल्या अनेक दिवसांपासून धोकादायक पद्धतीने लोंबकळणाऱ्या विद्युत तारांकडे महावितरण कंपनीने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. सदर प्रकार स्थानिकांनी महावितरणाकडे तक्रार केली आहे. सदर काम तात्काळ बदलून घ्यावेत, तसेच संभाव्य धोका टाळावा असे स्थानिकांचे म्हणणे आहे. सदर ठिकाणी यशवंतराव मोरे पाटील हायस्कूल ही आश्रम शाळा जवळ असल्यामुळे तेथील विद्यार्थी हे चुकून त्या परिसरामध्ये फिरू शकतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
कठडा तोडून गाडी पडली नीरा नदीत!
2 Comments on “लोंबकळणाऱ्या विद्युत तारांचा वाढला धोका!”