बारामती, 19 सप्टेंबरः बारामतीमध्ये गेल्या काही दिवसांत महिला अत्याचारांचे प्रमाण वाढले आहेत. यामुळे पोलीस कार्य पद्धतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तरुण-तरुणींमध्ये मोबाईलमुळे झालेले सुसंस्कार प्रबोधनाचा अभाव, त्यामुळे मुली आणि महिला यांच्यावर अत्याचार वाढल्याचे प्रमाण जनसामान्यांच्या मनात आहे.
महिलांवर अत्याचार करणाऱ्या तीन आरोपींना बारामतीत अटक
पोलीस कार्यालय परिसरात दलालांची संख्या वाढली आहे. सर्वसामान्य माणसाला अपमानजनक वागणूक मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा पोलिसांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल होताना दिसून येत आहे. म्हणून मोहल्ला कमिटी समाजसेवी शाखा निर्माण करून बारामतीकरांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे. झोपडपट्टी कुंड दारूवाले, मटकेवाले यांच्याबद्दल कडक धोरण स्वीकारून समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे वातावरण निर्माण केले पाहिजे.
अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अर्थपूर्ण व्यवहारातून पोलीस स्टेशनला तडजोड केले जातात. तसेच अन्यायग्रस्त माणसांना कोर्टात जाण्याच्या सल्ले दिले जातात. अन्यायग्रस्त व्यक्ती विरोधात खोटे फिर्याद देण्यास प्रवृत्त केले जाते, राजकीय व दलालांच्या हस्तक्षेपांमुळे पोलिस यंत्रणा बदनाम होत आहे. समाज अभिमुख पोलीस प्रशासन ही आज काळाची गरज आहे. प्रबोधन प्रशासकीय कायद्याची माहिती व कायद्यात त्याच्याबद्दल आधर निर्माण करणे, पोलिसांकडे प्रत्येक माणूस गुन्हेगार असते, असे नाही. प्रत्येक गुन्हेगार कायम गुन्हेगार राहील, असेही नाही. बारामतीमध्ये होत असलेले गुन्हे आणि वाढत असलेले गुन्हे हे बारामती पोलिसांवर अविश्वास तर नाही ना? असेच चित्र सध्यातरी दिसत आहे.