शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा

दैंनदिन जीवनात बदलत्या जीवनशैली, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव, ताणतणाव, वाढता कामाचा ताण अशा अनेक कारणांमुळे पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होण्यास कारणीभूत असतात. शुक्राणूंची संख्या कमी झाल्याने याचा परिणाम पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर होतो. पुरुषांनी आहारात या गोष्टींचा समावेश केल्यास शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्तेसह स्टॅमिनाही वाढवू शकतात.

  1. अंडीमध्ये ‘व्हिटॅमिन ई’ मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे शुक्राणूंची गतिशीलता व संख्या वाढण्यास मदत होते, तसेच अंडी शुक्राणूंना मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात, ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता दुप्पट होते.
  2.  रोज अंजीर खाल्ल्याने शुक्राणूंची संख्या वाढून प्रजनन क्षमता सुधारते.
  3.  डाळिंबाचा रस शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढवण्यास मदत करतो.
  4. लसणाच्या 3-4 पाकळ्या सकाळी चघळल्याने वीर्याचे प्रमाण वाढवण्यास मदत करते.
  5. ‘व्हिटॅमिन ए’ च्या कमतरतेमुळे पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता कमी होत जाते. ब्रोकोलीमध्ये असे पौष्टिक घटक असतात, जे शरीरात निरोगी आणि सक्रिय शुक्राणू तयार करण्यास मदत करते.
  6.  ‘व्हिटॅमिन सी’ सह समृद्ध, शतावरी मुक्त रॅडिकल्सपासून शुक्राणूंचे संरक्षण करण्यास मदत करते. याचे सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या वाढते आणि प्रजनन क्षमता सुधारते.
  7.  केळीमध्ये मॅग्नेशियम, बी-1 आणि ‘सी’ जीवनसत्त्वासोबतच ब्रोमेलेन नावाचे एन्झाइम असते, जे शुक्राणूंची संख्या वाढवते, तसेच मूडही सुधारतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *