देशातील पहिल्या रॅपिडेक्स ट्रेनचे उद्घाटन

उत्तर प्रदेश, 20 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) देशातील पहिल्या रॅपिडेक्स ट्रेनचे आज (दि.20) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी मोदींनी उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद येथून रॅपिड रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर पंतप्रधानांनी या ट्रेन मधून प्रवास केला. त्यावेळी मोदींनी रेल्वेमध्ये असलेल्या शाळकरी मुलांशी संवाद साधला. या रॅपिड रेल्वेला ‘नमो भारत’ हे नाव देण्यात आले आहे.

भाजप आमदाराची वेबसाईट हॅक! लावला पाकिस्तानचा झेंडा

सर्वसामान्यांना या रेल्वेमधून उद्यापासून (21 ऑक्टोबर) प्रवास करता येणार आहे. त्यावेळी प्रवाशांना मोबाईल आणि कार्डद्वारेही तिकीट खरेदी करता येईल. दरम्यान पहिल्या टप्प्यात ही रेल्वे दिल्ली-गाझियाबाद-मेरठ कॉरिडॉरवर साहिबाबाद ते दुहाई डेपोपर्यंत 17 किमी अंतरावर धावणार आहे. हा प्रवास केवळ 12 मिनिटांतच पूर्ण होईल. त्यामूळे या रेल्वे मधील प्रवाशांचा प्रवास सोपा होणार आहे. तत्पूर्वी ही रेल्वे ताशी 160 किलोमीटर वेगाने धावणार आहे.

या आत्महत्यांना केवळ सरकारच जबाबदार- जरांगे पाटील

नमो भारत या रेल्वेमध्ये प्रवाशांना अनेक प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत. त्यात महिलांसाठी राखीव जागा असतील. तसेच दिव्यांगांसाठीही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या रेल्वेत दिव्यांगांसाठी स्वतंत्र सीट तयार करण्यात आली आहे. सोबतच या रेल्वेतील आसनव्यवस्था अतिशय आरामदायी बनवण्यात आली आहे. तत्पूर्वी, नमो भारत रेल्वेच्या उद्घाटन समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

One Comment on “देशातील पहिल्या रॅपिडेक्स ट्रेनचे उद्घाटन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *