बारामती, 13 मेः लॉकडाऊन नंतर ग्लोबल मार्केटची दारवाजे मोठ्या प्रमाणात उघडले आहेत. या संधीचे सोने करत बारामतीही एका ग्लोबल कंपनीच्या ऑफिसचे उद्घाटन नुकतेच पार पाडले. बारामती शहराच्या वैभवात आणखी भर टाकणारे माल्टा बिसनेस सेंटरचे ऑफिस हे भिगवण रोडवरील पंजाब नॅशनल बँकखाली उभारण्यात आले आहे. या ऑफिसचे उद्घाटन नुकते माजी नगरसेवक किरण गुजर यांच्या हस्ते पार पडले.
माल्टा बिसनेस सेंटरचे डायरेक्टर आर्किटेक्ट विनय सोनोने हे माल्टा इंडियन कमिशन ब्युरोचे सदस्य आहेत. माल्टा बारामती सेंटरमध्ये नोकरीसाठी आलेली प्रत्येक व्यक्तीची ऑनलाईन स्क्रिनिंग-इंटरव्हिव डायरेक्ट माल्टा गव्हर्नमेंट रजिस्टर कंपनीद्वारे होणार असल्याचे डायरेक्टर विनय सोनोने यांनी यावेळी सांगितले. तसेच माल्टा बिसनेस सेंटर हे माल्टा देशातल्या कंपनीची शाखा असून बारामतीसह इतर भागातून माल्टा युरोपमध्ये नोकरीला लागलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी माल्टा देशात काही अडचणी आल्यास बारामती शाखा त्यांच्या सोयीसाठी 24 तास उपलब्ध असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माल्टा बिसनेस सेंटर द्वारा बारामती भागातील लघु उद्योजकांना त्यांच्या वस्तू माल्टामध्ये एक्स्पोर्ट करण्याची संधी मिळणार असल्याचे मत किरण गुजर यांनी यावेळी सांगितले. माल्टा बिसनेस सेंटरला गव्हर्नमेंट ऑफ माल्टाचे अनेक खाद्य पदार्थ, अनेक प्रकारचे बिल्डिंग मटेरियल सप्लाय आदी इम्पोर्ट ऑर्डर मिळालेले आहे. बारामती भागातील लोकांना आपले माल एक्स्पोर्ट करण्याची संधी माल्टा बिसनेस सेंटर द्वारे दिली जाणार आहे.
माल्टा बिसनेस सेंटर बारामतीच्या युवा उद्योजक शाहीन सोहेल शेख या डायरेक्टर म्हणून काम पाहणार आहेत. अजितदादा पवार आणि किरण गुजर यांच्या नेतृत्वात जशी बारामती घडत आहे, त्यामध्ये माल्टा बिसनेस सेंटर युरोपमधील नवीन टेक्नोलॉजी बारामतीमध्ये आणणार आहे. यामुळे बारामतीच्या विकास कामांना हातभार लागणार असल्याचे मत शाहीन शेख यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला बारामती एमआयडीसी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष धनंजय जामदार, बच्चूभाई शेख, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, उद्योजक सलीम बागवान, इंजिनियर सोहेल शेख आदी मान्यवर उपस्थित होते.