बारामतीत कापडी पिशवी दुकानाचे उद्घाटन

बारामती, 3 ऑगस्टः बारामती शहरातील इंदापूर चौक गणेश मार्केट येथे नगरपरिषद दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत दीक्षा महिला बचत गटाने कापडी पिशवी बनवणे व विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सदर दुकानाचे उद्घाटन आधार शहर स्तर संघाचे अध्यक्ष छाया धर्माधिकारी यांनी केले. बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या संकल्पनेतून कापडी पिशवी व्यवसायाची सुरुवात करण्यात आली.

दौंड-बारामती एसटी पुन्हा बंद; प्रवाशांचे हाल

आज महाराष्ट्रभर प्लास्टिक बंदी करण्यात आलेली आहे. कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करून पर्यावरणाचे संवर्धन करायचे आहे, असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले. सदर कार्यक्रमाला राजश्री जाधव, सलमा तांबोळी, सविता टेकाळे, अली मुल्ला, रोहिणी चांदगुडे, बांधकाम इंजिनिअर रत्न रंजन गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष संजय लालबिगे, माजी नगरसेविका दिपाली लालाबिगे व संतोष टेकाळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *