बारामती, 8 मार्चः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणुन संबोधला जातो, पण या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी पक्षाचा अगदी तेवढ्याच ताकदीने पक्ष वाढवत आहे. बारामती तालुक्यातील सांगवी आणि शिरवली या गावातील काही तरुणांनी 5 मार्च 2023 रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश भाजप जिल्हा समन्वयक समिती शरद बुट्टे पाटील, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे व पांडूरंग कचरे यांच्या उपस्थितीत केला.
तब्बल 106 रक्तदात्यांनी केले रक्तदान
यावेळी बारामती तालुका किसान मोर्चा अध्यक्ष महेंद्र तावरे व तालुका संघटक सरचिटणीस प्रमोद खराडे व समस्त ग्रामस्थ सांगवी व शिरवली यांच्या तर्फे शरद बुट्टे पाटील, वासुदेव नाना काळे व पांडुरंग मामा कचरे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बारामती तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरांनी कार्यकर्त्यांना बळ देऊन पक्ष वाढीसाठी सर्वच प्रयत्नशील राहून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचा निर्धार केला. सर्व मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
बारामती नगरपरिषदेच्या एनडीके ठेकेदाराची कामगारांवर मुजोरी
One Comment on “बारामतीत भाजपा किसान मोर्चा शाखेचे उद्घाटन”