लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात पोलीस आणि सीआरपीएफ जवानांनी रूट मार्च काढला

बारामती, 03 एप्रिल: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामती शहरात बारामती शहर पोलीस स्टेशन आणि सीआरपीएफ जवानांनी आज रूट मार्च काढला. या मोर्चात पोलीस आणि सशस्त्र सीआरपीएफ जवान मोठ्या सहभागी झाले होते. निवडणुकीसाठी विशेष कर्तव्यावर असलेले पोलीस दलही या रूट मार्च मध्ये सामील झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, बारामती शहरात शांतता राखणे आणि लोकांचे मनोधैर्य वाढवणे हा या रूट मार्चचा प्रमुख उद्देश आहे. याशिवाय निवडणुकीसाठी विशेष ड्युटीवर असलेल्या सुरक्षा दलांना परिसराची माहिती देण्यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला.

पाहा व्हिडिओ –

 



यावेळी पोलीस दल आणि सीआरपीएफ जवानांनी बाजारपेठ व शहरात फ्लॅग मार्च काढून लोकांना शांततेत ही निवडणूक पार पाडणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांनी जनतेला नि:पक्षपातीपणे व निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी यावेळी बारामती शहरातील लोकांना कोणतीही भीती किंवा दबाव न ठेवता मतदान करण्याचे आवाहन केले. याशिवाय, या लोकसभा निवडणूकीत कोणत्याही प्रकारचा विघ्न आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना सोडले जाणार नाही, तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील या रूट मार्च मधून देण्यात आला आहे.



लोकसभा निवडणुकीसाठी देशात सध्या आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, बारामती शहरातील कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी तसेच मतदारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी बारामती शहर पोलीस आणि सीआरपीएफ जवान सज्ज झाले आहेत. नागरिकांनी अफवांवर लक्ष देऊ नये. तसेच कोणत्याही बेकायदेशीर घटनेची माहिती मिळाल्यास ती पोलिसांना कळवा, असे आवाहन देखील बारामती शहर पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *