दिल्ली, 08 मे: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात काल लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. या मतदानाची सायंकाळी 6 वाजेपर्यंतची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यामध्ये 11 मतदारसंघात मतदान झाले. राज्यात काल सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 61.44 टक्के मतदान झाले आहे. याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. यामध्ये राज्यातील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 70.35 टक्के इतके मतदान झाले आहे. तर बारामतीत सर्वात कमी म्हणजे सरासरी 56.07 टक्के मतदान झाले आहे.
#लोकसभानिवडणूक2024
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) May 8, 2024
देशात तिसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत
६४. ४० टक्के मतदानाचा अंदाज.
महाराष्ट्रात ११ मतदार संघासाठी ६१. ४४ टक्के मतदानाचा अंदाज. #LokSabhaElections2024 #GeneralElections2024 #ChunavKaParv #DeshKaGarv #ECI #IVoteForSure @DDNewslive pic.twitter.com/sj5W7eB7m2
पाहा राज्यातील मतदानाची आकडेवारी
राज्यातील तिसऱ्या टप्प्यात रायगड लोकसभा मतदारसंघात सरासरी 58.10 टक्के मतदान झाले. बारामती – 56.07 टक्के, उस्मानाबाद – 60.91 टक्के, लातूर – 60.18 टक्के, सोलापूर – 57.61 टक्के, माढा – 62.17 टक्के, सांगली – 60.95 टक्के, सातारा – 63.05 टक्के, रत्नागिरी -सिंधुदूर्ग- 59.23 टक्के, कोल्हापूर – 70.35 टक्के आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सरासरी 68.07 टक्के इतके मतदान झाले आहे.
कोणत्या राज्यात किती टक्के मतदान?
याशिवाय देशातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात काल 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 93 मतदारसंघांमध्ये सरासरी 64.04 टक्के मतदान झाले. या आकडेवारीनुसार, आसाममध्ये सर्वाधिक सरासरी 81.71 टक्के मतदान झाले. तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी 57.34 टक्के इतके मतदान झाले. यामध्ये आसाम – 81.71 टक्के, बिहार – 58.18 टक्के, छत्तीसगड – 71.06 टक्के, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव – 69.87 टक्के, गोवा – 75.20 टक्के, गुजरात – 58.98 टक्के, कर्नाटक – 70.41 टक्के, मध्य प्रदेश – 66.05 टक्के, महाराष्ट्र – 61.44 टक्के, उत्तर प्रदेश – 57.34 टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये 75.79 टक्के इतके मतदान झाले आहे.