इंदापूर, 2 नोव्हेंबरः इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा काही वर्षांपासून हलक्या आणि मुरमाड जमिनीत सीताफळाचे पीक घेण्याकडे कल वाढला आहे. परिणामी तालुक्यात सीताफळ फळ बागेखालील क्षेत्र चांगलेच वाढले आहे. मोठे समारंभ आणि लग्न समारंभात सीताफळापासून तयार केलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांना मोठी मागणी असते. तसेच सीताफळामध्ये वात व पित्तशामक गुणही आढळतात. त्यामुळे बाजारात सीताफळाचे दर नेहमीच तेजीत राहतात. सध्याही सीताफळाचा दर प्रतिकिलोस किमान 100 रुपयांच्या पुढे आहे.
गुणवडीत अवैध दारू विक्रेत्यावर सेशन कमिट गुन्हा दाखल
सीताफळ बागेत कीड-रोगनाशकांचा मोठा खर्च येत नाही. शेळ्या-मेंढ्या सीताफळाची पाने खात नाहीत, त्यामुळे सीताफळाची बाग सुरक्षित समजली जाते. कृषी विभागाच्या फळबाग लागवड योजनेतून या पिकाचे लागवडीसाठी 100 टक्के अनुदान दिले जाते. परिणामी शेतकऱ्यांचा सीताफळ लागवडीकडे कल वाढला आहे. सीताफळ फळबागेमध्ये पहिली दोन ते तीन वर्षे अंतरपिके घेता येतात. पूर्वी पुणे जिल्ह्यात सासवड परिसरात सीताफळाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. मात्र, आता जिल्हाभर अनेक शेतकरी सीताफळाचे पीक यशस्वीपणे घेत आहेत.
एलपीजी गॅस सिलेंडर 115 रुपयांनी स्वस्त!
सीताफळाच्या बागेस पाणीही कमी लागते. त्यामुळे उत्पादन खर्चाच्या तुलनेत सीताफळ बागेपासून शेतकर्यांना चांगला आर्थिक फायदा होत असल्याचे कृषी पदवीधर सुधीर पाटील, अमर भोसले यांनी सांगितले.
One Comment on “इंदापुरात सीताफळ शेतीकडे वाढला कल”