बारामती, 8 नोव्हेंबरः बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावात ग्रामस्थांच्या वतीने राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय कुस्तीचा आखाडा भरविण्यात आला होता. यात पहिली कुस्ती अडीच लाख रुपयांची पै. सिकंदर शेख विरुद्ध पै. मनजीत खत्री, दुसरी कुस्ती दीड लाख रुपयांची पै. बाला रफिक शेख, विरुद्ध महारुद्र काळे विरुद्ध संतोष जगताप तर तिसरी कुस्ती चाळीस हजार रुपयांची पै. मोईन पटेल, विरुद्ध पै. अभिषेक देवकाते यांच्यात रंगली. तसेच छोट्या मोठ्या एकूण अडीचशे कुस्त्या झारगडवाडीच्या कुस्तीच्या आखाड्यात 7 नोव्हेंबर 2022 रोजी पार पडल्या.
बारामतीत मायक्रोसॉफ्ट उभारणार कृषि प्रकल्प
बारामती तालुक्यातील झारगडवाडीत पहिल्याच वर्षी कुस्तीचा आखाडा रंगला होता. यामध्ये पहिली कुस्ती ही अडीच लाख रुपयांची ठेवण्यात आली होती. ही कुस्ती पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान मनजीत खत्री यांच्यात रंगली. यामध्ये पापणी लावायच्या आतच पैलवान सिकंदर शेख याने विरुद्ध लढत असलेल्या पैलवानाची पायाची मुळी बांधत क्षणात चितपट करत झारगडवाडी ग्रामस्थांची मने जिंकली.
उजनीचं पाणी बारामती, इंदापूरला मिळणार नाही?
One Comment on “बारामतीत अडीच लाखांच्या कुस्तीचा सिकंदर ठरला मानकरी”