बारामतीत जलकुंडांऐवजी वाहत्या पाण्यात गणेश मुर्ती विसर्जनास पसंती

बारामती, 10 सप्टेंबरः दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर मोठ्या हर्ष उल्हासात बारामती शहरासर तालुक्यात लाडक्या गणरायाचं घरा घरात स्वागत करण्यात आलं. गेल्या दहा दिवसात मोठ्या आनंद, उत्साहात लाडक्या गणपतीचा प्रत्येकाकडून पाहुणचार करण्यात आला. गणेश भक्तांकडून काल, 9 सप्टेंबर 2022 रोजी अनंत चतुर्थी दिवशी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात विसर्जन करण्यात आले.

विसर्जित गणेश मुर्त्या गोळा करण्यासाठी बानपचं संकलन रथ रवाना

बारामती नगर परिषदेकडूनही गणपती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आली होती. विसर्जनासाठी बानपकडून शहराच्या विविध भागात तब्बल 40 ठिकाणी जलकुंड उभारण्यात आले होते. तर या जलकुंडातून गणपतीच्या मुर्त्या गोळा करण्यासाठी संकलन रथाचीही सोय करण्यात आली होती. तसेच गोळा केलेले गणपतीच्या मुर्त्या या एका विहिरीच्या पाण्यात विसर्जितही करण्यात आल्या. मात्र अनेकांनी बानपने बसविलेल्या जलकुंडांमध्ये लाडक्या गणरायाची मुर्ती विसर्जित करण्यात नापसंती दर्शविली. अनेकांनी गणेश मुर्त्यांचे विसर्जन हे कॅनॉल आणि नदीच्या वाहत्या पाण्यात केले.

 

विशेष म्हणजे काहींनी तर गणेश मुर्त्यांचे विसर्जन हे बानपचे पर्यावरण विभाग प्रमुख व आरोग्य अधिकारी आदित्य बनकर आणि बानप कार्यालयीन प्रमुख अडसूळ मॅडम यांच्या समक्ष कॅनॉलमध्ये गणेश मुर्त्यांचं विसर्जन केलं. मात्र या प्रकाराकडं त्यांनी मुखदर्शक म्हणून पाहत राहिले. असाच एक व्हिडीओ भारतीय नायक च्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *