बारामतीच्या जनावरे बाजारात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली!

बारामती, 12 ऑक्टोबरः आज, (गुरुवारी) 12 ऑक्टोबर रोजी बारामतीच्या जळोची येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या जनावरे बाजारात शासनाच्या आदेशाची पायमल्ली केल्याचे सर्रासपणे आढळून येत आहे. पुणे जिल्ह्यात लिम्पी आजाराने जनावरांवर तीव्र आजाराची लक्षणे दिसत आहेत. तसेच या आजाराने जनावरांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताहेत. असे असतानाही बारामती येथील आठवडे जनावरे बाजारात जनावरांच्या आरोग्याचे प्रमाणपत्राशिवाय जनावरांची खरेदी- विक्री केल्याचे निदर्शनात येत आहे.

तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ!

बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल पवार यांच्या आदेशानुसार हे बेकादेशीर कृत्य सुरु असल्याचे बाजार समितीच्याच कर्मचाऱ्यांकडून समजते. बारामती तालुका परिसरासह जिल्ह्याभरातील जनावरे हे बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या जनावरे आठवडे बाजारात खरेदी- विक्रीकरीता येत असतात. त्यामुळे लिम्पी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. असे असतानाही, शासनाच्या नियमांचे पालन बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या जनावरे आठवडे बाजारात होताना दिसत नाही. फक्त आर्थिक फायद्या पोटी जनावरे बाजारात बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीकडून लिम्पी बाधित जनावरे सोडली जात आहे. यामुळे सुदृढ आणि निरोगी जनावरांना लिम्पी रोगाची लागण होण्याचा धोकाही संभावत आहे. याचा सरळ फटका हा तालुक्यासह जिल्ह्याभरातून येणाऱ्या पशुपालकांवर होत आहे.

बारामतीमधील डॉक्टरांचे आरोग्य बिघडले!

2 Comments on “बारामतीच्या जनावरे बाजारात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *