बारामतीमधील ऊसतोडीवर पावसाच्या पाण्याचा परिणाम

बारामती, 31 ऑक्टोबरः बारामती तालुक्यात साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील 36 गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतजमिनीत पाणी साठले गेले आहे. यामुळे ऊसतोडणी करताना अडथळा निर्माण होत आहे. तसेच पावसामुळे रस्त्याची दुर्दशा झाल्याने वाहतुकीची समस्या तोडणी कामगारांना भेडसावत आहे.

शेतकऱ्यांना बारामती कृषि उपविभागाचे आवाहन

याबाबत शेतमजूर वीरचंग खैरे, उज्ज्वल पवार आणि शेती अधिकारी गायकवाड यांनी सांगितले की, अंजनगाव, जळगाव आदी ठिकाणी सध्या शेतीमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे ऊसतोडणी कशी करायची, हा मोठा प्रश्न आहे. सध्या शेतीपासून सुमारे दीड किलो मीटरवर वाहने थांबवून ऊस वाहतूक करावी लागत आहे. हे काम जिकिरीचे बनले असून शेतीतील ओलसरपणा कमी झाल्याशिवाय ऊसतोडणी करणे अशक्य आहे. त्यामुळे ऊसतोडणीला विलंब लागण्याची शक्यता आहे.

बारामतीत बर्गे चोरणाऱ्या टोळीला अखेर अटक

शेतीत ओलसरपणा असल्याने तोडणी करणे अवघड झाले आहे. तसेच रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर होणार आहे. वाहनांचे नुकसान होण्याची तसेच अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

One Comment on “बारामतीमधील ऊसतोडीवर पावसाच्या पाण्याचा परिणाम”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *