माळावरची देवी मंदिराजवळील कृत्रिम जलकुंडात गणपती बाप्पाचे विसर्जन

बारामती, 17 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) देशभरात आज गणेशोत्सव मोठ्या आनंदमय वातावरणात पार पडला. गेल्या दहा दिवसांत गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. त्यानंतर आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला. यावेळी देशभरात विविध ठिकाणी गणपती विसर्जनासाठी मिरवणुका काढण्यात आल्या. सध्या अनेक ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. बारामती शहरात देखील गणेशोत्सव मोठ्या आनंदमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

पहा व्हिडिओ –

 

उपक्रमाला चांगला प्रतिसाद

बारामती नगर परिषदेच्या वतीने गणेश विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी कृत्रिम जलकुंडे उभारण्यात आली आहेत. बारामती शहरात गणपती विसर्जनासाठी एकूण 32 कृत्रिम जलकुंडे उभारण्यात आली आहेत. जलप्रदूषण टाळण्यासाठी बारामती नगर परिषदेने हा निर्णय घेतला आहे. नगर परिषदेच्या या उपक्रमाला बारामतीकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. बारामती शहरातील अनेक नागरिकांनी आपल्या घरातील लाडक्या बाप्पाचे या कृत्रिम जलकुंडात विसर्जन केले आहे. नगर परिषदेच्या वतीने बारामती शहरातील माळावरची देवी मंदिराजवळ देखील कृत्रिम जलकुंड उभारण्यात आले आहे. याठिकाणी अनेक नागरिकांनी त्यांच्या गणपतीचे विसर्जन केल्याचे पहायला मिळाले आहे. याप्रसंगी नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

याठिकाणी जलकुंड उभारले

दरम्यान, बारामती शहरात यंदा गणपती विसर्जनासाठी 32 ठिकाणी कृत्रिम जलकुंड उभारण्यात आली आहेत. यामध्ये परिषद प्राथमिक शाळा, तांदुळवाडी आणि शिवाजीनगर, चिंचकर शाळा, तांदुळवाडी, कवी मोरोपंत शाळा, श्रीरामनगर, रुई क्षे. कार्यालय समोर, अभिमन्यू कॉर्नर (बनकर वडेवाले जवळ), सूर्यनगरी मंडई शेजारी, अंगणवाडी, सी.टी. इन चौक, जळोची क्षेत्री कार्यालय, जि.प. प्राथमिक शाळा, माळावरची देवी मंदिरालगत, गणेश मंदिरा समोर, सायली हिल, सहयोग सोसायटी गेट समोर ख्रिश्चन कॉलनी, जेष्ठ नागरीक संघ कार्यालय, कॅनॉल शेजारी, वीर गोगादेव मंदिराजवळ, रिंगरोड कॅनॉल पुलाजवळ, शाहू हायस्कूल, पाटस रोड, दशक्रिया विधी घाट, कसबा, देशमुख समाज मंदिर शाळा क्र. 01, खरेदी विक्री पेट्रोलपंपा शेजारी, खंडोबानगर मुख्यचौक, टेक्लीकल हायस्कुल, बालकल्याण केंद्र प्राथमिक शाळा, मुक्ती टाऊनशिप फेज 2, धों. आ. सातव शाळा, जगतापमळा, परकाळे बंगला, माता रमाई भवन, तीन हत्ती चौक, तुपे बंगला समोर, अशोक नगर, पंचायत समिती समोर भारत बेकरी, मोरगांव रोड धावजी पाटील कॅनाल पुल, श्री. पांचगणे पत्रकार कॅनाल बाजूस, सातव वस्ती जि.प. शाळा आणि शाळा क्र. 2 कसबा या ठिकाणी कृत्रिम जलकुंडाच्या व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *