जखमी जनावरांवर प्राणी मित्रांकडून तात्काळ उपचार

बारामती, 13 ऑक्टोबरः बारामती येथील बालक मंदिर शाळा येथे 12 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9 च्या सुमारास एका वासरूचा अपघात झाला होता. मात्र सदर वासरूच्या मदतीला कोणीच धावले नाही. सदर अपघाताची घटना विक्रांत गदादे यांनी ‘भारतीय नायक’चे पत्रकार अभिजीत कांबळे आणि पत्रकार सम्राट गायकवाड यांच्या निदर्शनात आणून दिली.

शेतकऱ्यांना पशुधन विकास अधिकाऱ्यांचे आवाहन

सदर माहिती मिळताच पत्रकार अभिजीत कांबळे आणि पत्रकार सम्राट गायकवाड यांनी तालुक्यातील लघु पशु वैद्यकीय चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त पशुवर्धन डॉ. आर. एल. त्र्यंबके यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर डॉ. त्र्यंबके यांनी तात्काळ दखल घेत डॉ. वाघमोडे यांना उपचार करण्यात सांगितले.

बारामतीत दान उत्सवासाठी नागरीकांना आवाहन

तात्काळ घटनास्थळी पोहोचून डॉ. वाघमोडे यांनी वासरूवर भर पावसात उपचार केले. सध्या ते वासरू व्यवस्थित असून स्थानिक नागरिकांनी डॉ. वाघमोडे यांचे तसेच ‘भारतीय नायक’चे पत्रकार यांचे आभार मानले. यासह मोकाट सुटलेल्या जनावरांवरून नगरपालिकाविषयी रोष व्यक्त केला.

2 Comments on “जखमी जनावरांवर प्राणी मित्रांकडून तात्काळ उपचार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *