“गेल्या 34 वर्षापासून मी राजकीय आणि सामाजिक जीवनात कार्यरत आहे. शिवसेनेतील अनेक नेते मला ओळखतात. मी भाजपा-शिवसेना युतीमध्ये अनेक वर्षे काम केले आहे. विधिमंडळात माझे अनेक मित्र मंडळी आहेत. आम्ही 34 वर्षे काम करून ही प्रतिमा तयार केली आहे. त्यामुळे अशाप्रकारे फोटो व्हायरल करून प्रतिमा खराब करता येत नाही. त्यामुळे माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्या प्रयत्न त्यांना लखलाभ असो. तसेच मी आणि माझ्या कुटुंबाने हाँगकाँगला जाण्याचे ठरवले. यासाठी घरच्यांनी मला 3 दिवसांचा वेळ काढायला सांगितला होता. कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यावर कॅसिनो क्रॉस करून रूममध्ये जावे लागते, हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र त्याचवेळी कुणीतरी हा फोटो काढून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला.” असे चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.
तत्पूर्वी संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जुगारात साडेतीन कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात देखील बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “साडे तीन कोटी रुपये परदेशात घेऊन जाता येत नाही. एक लाख रुपये नेले तरीही अनेक वेळा चेकिंग करण्यात येते. माझे हाँगकाँगमध्ये कोणीच मित्र नाही, त्यामुळे साडेतीन कोटी खर्च करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र या प्रकरणामुळे आमच्या कुटंबाला व्यक्तिगत त्रास झाला.” असे ते यावेळी म्हणाले.
One Comment on “असे फोटो व्हायरल करून प्रतिमा मलीन करता येत नाही – बावनकुळे”