मुंबई, 23 फेब्रुवारीः मुंबई येथील आझाद मैदान येथे 21 फेब्रुवारी 2023 पासून प्रबुद्ध युवक संघटनेच्या वतीने बेकायदेशीर भंगार व्यावसायिक यांच्यावर कारवाई करण्यासाठी आमरण उपोषण सुरू होते. सदर आंदोलनाची गंभीर दखल घेत पोलीस महासंचालक यांनी ग्रामीण अधीक्षक यांना कारवाई करण्यासंबंधी तातडीने आदेश काढले. उपोषणकर्त्यास परावर्त व्हावे, असे सांगितल्याची माहिती प्रबुद्ध संघटनेचे अध्यक्ष अभिजीत कांबळे, सचिव गणेश जाधव व उपोषणकर्ते ओंकार माने, शुभम कांबळे, आशिष भोसले यांनी भारतीय नायकच्या वार्ताहर यांच्याशी बोलताना सांगितले.
बेकायदेशीर भंगार व्यवसायिकांवर कारवाईसाठी प्रबुद्ध संघटनेचे आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू
पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी 22 फेब्रुवारी 2023 रोजी तातडीने दखल घेत बेकायदेशीर भंगार व्यावसायिकांवर तात्काळ कारवाई करण्यासंबंधी आदेश दिले आहेत. त्यामुळे भंगार व्यावसायिकांचे धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे. सदरच्या उपोषणाला अनेक राजकीय पक्ष, अनेक सामाजिक संघटना यांनी पाठिंबा दिला, त्यामुळे प्रबुद्ध युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सम्राट गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.
राजे प्रतिष्ठान न्यु इंग्लिश स्कुल खंडूखैरेवाडी येथे शिवजयंती साजरी
One Comment on “बेकायदेशीर भंगार व्यवसाय करणाऱ्यांवर बसणार चाप”