कांद्याच्या शेतात अफुची बेकायदेशीर लागवड, दोघे पोलिसांच्या ताब्यात

सासवड, 29 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) सासवड परिसरात कांद्याच्या शेतात अफुची बेकायदेशीर लागवड केल्याप्रकरणी दोन जणांना पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तानाजी बडदे (69) आणि दशरथ बडदे (65) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात सासवड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यातील कलम 8 ब, 8 क, 17 क, 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्या शेतातील 10 किलो 500 ग्रॅम वजनाची 21 हजार रुपये किमतीची अफुची ओली बोंडे जप्त केली आहेत.

https://twitter.com/puneruralpolice/status/1763091715164963328?s=19

पोलिसांची शेतात छापा टाकून कारवाई

या शेतकऱ्यांनी सासवड परिसरातील कोडीत या गावात कांद्याच्या शेतामध्ये अफूची लागवड केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांच्या शेतात छापा टाकला. त्यावेळी तानाजी बडदे आणि दशरथ बडदे या दोघांनी त्यांच्या कांद्याच्या शेतामध्ये बेकायदेशीरपणे अफूची लागवड केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी आता त्या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांचा कारवाईचा इशारा

दरम्यान, अंमली पदार्थ वनस्पतींची बेकायदेशीर लागवडीतुन झटपट पैसा कमविता येतो, अशी धारणा काही लोकांमध्ये आहे. कायद्याचा भंग करून अफू, गांजा अशा अंमली पदार्थांची लागवड करू नका. अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या गोष्टींपासून लोकांनी लांब राहण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *