बारामती, 21 एप्रिलः (प्रतिनिधी- शरद भगत) पवित्र रमजान महिन्याच्या निमित्त बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर येथे मुस्लिम-मज्जिद येथे बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘इफ्तार पार्टी’ चे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादी आणि आई प्रतिष्ठानच्या वतीने इफ्तार पार्टी
वडगांवमधील हिंदू-मुस्लिम धर्मातील एकी आदर्शवत असुन इफ्तार पार्टीच्या माध्यमातून हे संबध अधिकच दृढ होतात, असे प्रतिपादन नानासाहेब मदने यांनी केले. याप्रसंगी मुस्लिम बांधवांना सर्वांच्या वतीने रमजान-ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित सर्वांचे मुस्लीम समाज बांधवाच्या वतीने गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
मुर्टी ग्रामपंचायतीत लटकवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचे पूजन
कार्यक्रमावेळी युवकाध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने, वाकी गावचे सरपंच किसन बोडरे, पांडुरंग घळगे, सोनु खोमणे, विशाल चव्हाण, पुष्कराज गायकवाड, अण्णासो मदने, लखन पवार, तेजेश शहा, परशुराम पाचर्णे, प्रतिक कुचेकर आदि मित्र परिवार यावेळी उपस्थित होते. मुस्लिम समाजाच्या वतीने हाफिज इब्राहीम फलाही, हाफिज अबुल कलाम फलाही, शहाबुद्दीन आब्बास मणेर (सर), टिपू भालदार, इकबाल शेख, वासिम पठान, कय्युम पठान, जुबर इनामदार, पिन्टु बागवान, सलमान पठान, मतिन पठान, जहाँगीर शेख, सलमान आत्तार, जमीर आत्तार आदींनी आभार मानले.
One Comment on “वडगांव निंबाळकर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन”