मी राजकारणातून कायमचा बाजूला जातोय- निलेश राणे

सिंधुदुर्ग,  25 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) केंद्रीय नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मोठी घोषणा केली आहे. “मी राजकारणातून कायमचा बाहेर जातोय, आता राजकरणात माझे मन रमत नाही,” असे ते म्हणाले आहेत. यासंदर्भात निलेश राणे यांनी ट्विट करून आपल्या भावना मांडल्या आहेत. “नमस्कार, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या 20 वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे.

सुशीलकुमार शिंदेंची निवृत्तीची घोषणा, लोकसभेचा उमेदवार जाहीर

भाजपमध्ये मला मध्ये खूप प्रेम भेटलं आणि भारतीय जनता पक्षासारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी खूप नशीबवान आहे. मी एक लहान माणूस आहे. पण राजकरणात मला खूप काही शिकायला मिळालं. काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले. आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही. टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र!” असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

बीएमडब्ल्यू कारमधून लाखोंची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद

दरम्यान, निलेश राणे यांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच त्यांनी हा निर्णय का घेतला असेल? याबाबत सध्या अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. तर दुसरीकडे मात्र, निलेश राणे यांच्या या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणाचे गणित बदलण्याची शक्यता आहे.

One Comment on “मी राजकारणातून कायमचा बाजूला जातोय- निलेश राणे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *