पूर्वतयारीसाठी बारामतीसह राज्यातून शेकडों भक्तगण सहभागी

बारामती, 19 ऑक्टोबरः जगभरातील भक्तगणांसाठी आणि प्रभुप्रेमी सज्जनांसाठी वार्षिक निरंकारी संत समागम भक्ती, प्रेम व एकोप्याचे एक असे अनुपम स्वरूप आहे. ज्यामध्ये समस्त भक्त सहभागी होऊन अलौकिक आनंदाची प्राप्ती करतात. हीच अखंडित श्रृंखला पुढे नेत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात 75 वा वार्षिक निरंकारी संत समागम 16 ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत हरियाणा राज्यातील समालखा येथील संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ येथे आयोजित केला जात आहे. ज्यामध्ये बारामतीसह राज्यातून मोठ्या संख्येने भक्त सहभागी होऊन सद्गुरु माताजींचे पावन आशीर्वाद व अमृतवाणीचा लाभ प्राप्त करतील. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी या संत समागमामध्ये विविध संस्कृती व सभ्यतांचा अनोखा संगम पहायला मिळणार आहे.

या वर्षीचा संत समागम स्वयमेव विशेष आहे. कारण मागील दोन वर्षांमध्ये केवळ ऑनलाईन माध्यमातूनच सर्व भक्तांनी या समागमाचा आनंद प्राप्त केला. या वर्षी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या सान्निध्यात प्रत्यक्ष रूपात समागमामध्ये सहभागी होणार आहे. समागम परिसर आणि आसपासच्या क्षेत्रांमध्ये जोरदार पूर्वतयारी मागील अनेक दिवसांपासून सुरु झालेली आहे. जवळपासच्या दिल्ली व एन. सी. आर व्यतिरिक्त देशातील अन्य राज्यांतूनही संतजन मोठ्या संख्येने पोहचून या सेवेमध्ये आपले योगदान देत आहेत. त्यामध्ये मुंबईसह महाराष्ट्रातून शेकडोंच्या संख्येने सेवादार भक्त तुकड्या तुकड्यांनी त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या कालावधीत समागम स्थळावर जाऊन सेवा कार्य करत आहेत.

या सेवांमध्ये मैदानांची स्वच्छता, समतलीकरण, ट्रॅक्टर, राजमिस्त्री, महाप्रसाद (लंगर) अशा विभिन्न प्रकारच्या सेवांचा समावेश आहे. या सेवांमध्ये आबालवृद्ध भक्तगण नवोन्मेषाने व उत्साहाने सेवा कार्य करत आहे. या 75वा वार्षिक निरंकारी संत समागम ‘आत्मिकता व मानवता – संगे संगे’ या विषयावर आधारित आहे, ज्यामध्ये जगभरातील वक्तागण, गीतकार तसेच कवी सज्जन आपले प्रेरणादायी भक्तीभाव व्यक्त करतील. आध्यात्मिकतेच्या जाणीवेत आणि आधारावरच मानवतेची भावना अवलंबून आहे.

One Comment on “पूर्वतयारीसाठी बारामतीसह राज्यातून शेकडों भक्तगण सहभागी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *