बिल्डरच्या अती लोभापायी सर्व सामान्यांची घरे धोक्यात

फुरसुंगी, 24 मेः फुरसुंगी येथील जमीन गट नं 160/6/अ/1, 160/6अ/1,160/6अ/2, 160/6ब/1,160/6ब/2, 160/7/1, 160/7/2, 160/7/3, 160/8, 160 /9 या गुंठेवारीची विभागीय चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना झाले आहेत. फुरसुंगीत गुंठेवारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे भविष्यात गंभीर धोका निर्माण होणार आहे. फक्त धंदा करण्याच्या हेतूने एजेंट जमीन विकत आहेत. शेत जमीन मोठ्या प्रमाणात कमी होत चालली आहे. तसेच भारत हा शेतीप्रधान आणि मान्सूनप्रधान देश आहे, हे वाक्य 1947 साली जेवढे सत्य होते तितकेच ते आज 2022 सालीही यथार्थ आहे. आजही उद्योगधंद्यांना लागणाऱ्या एकूण कच्च्या मालापैकी जवळजवळ 40 टक्के कच्चा माल हा शेतीमधूनच उद्योगांना मिळतो.

शेतीच नष्ट झाल्यावर काय दक्षा निर्माण होईल, हे येणारा काळातच कळेल. त्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांनी सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारतने दिलेल्या तक्रारीवरून विभागीय चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना केले आहेत. तुकडे बंदी कायद्या अंतर्गत गुंठेवारीची विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तेथील सर्व गुंठेवारी, बांधकाम आणि बिल्डर ब्लॉक यादीत टाकावीत तसेच बिल्डरची सर्व प्रॉपर्टी ताब्यात घेऊन गोर गरीबांची वाटप करावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *