पोट कमी करण्याचे घरगुती उपाय

बदलत्या जीवन शैलीमुळे तसेच बैठक काम, तसेच असंतुलित आहारामुळे अनेकांची पोटावर चरबी वाढते. या वाढणाऱ्या चरबीमुळे बऱ्यास समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र पोटावरील वाढत्या चरबीवर काही घरगुती उपाय आहेत, जे पोटावरील चरबी कमी करण्यात मदत करते.

त्रिफळा
एक चमचा त्रिफळा चुर्ण रात्री झोपण्याआधी घ्यावेत. त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यावे. असे नियमित केल्यास पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते, तसेच पोटाचे विकारही दूर होतात.

सूप
आहारात सूपचा समावेश केल्याने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. सूपचे सेवन रात्रीच्या वेळी केल्यास पोटाची चरबी लवकर कमी होऊन वचनही कमी होण्यासाठी मदत होते. सूपमध्ये जास्त कॅलरीज नसतात, तसेच ते पचन्यात हलकेही असते. यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी वाढत नाही.

मेथी दाणे
एक चमचा मेथीचे दाणे पाण्याच्या ग्लासात रात्रभर भिजत ठेवावे. त्यानंतर सकाळी उठल्यावर उपाशी पोटी ते पाणी पिणे फार फायदेशीर असते. मेथी दाण्याचे पाणी पिल्याने पोटावरील चरबी तर कमी होतेच तसेच पचन क्षमताही चांगली सुधारते.

संपुर्ण धान्य
आहारात संपुर्ण धान्यांचा समावेश करावा. संपुर्ण धान्यांचा आहारात समावेश केल्याने वजन लवकर कमी करण्यास मदत होते. तसेच संपुर्ण धान्यांमध्ये फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे पोटावरील अतिरिक्त चरबी लवकर कमी होते.

बीन्स
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी बीन्सचा समावेश खूप फायदेशीर राहते. यासाठी फरसबी आणि मसूर आहारात समावेश करणे फार उपयुक्त आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. फायबर हे वारंवार लागणारी भूक शमते. तसेच जास्त खाण्याची इच्छाही नियंत्रणात आणते. यामुळे आपोआपच वचन कमी करण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *