वातावरण बदलाचा परिणाम हा आरोग्य आपल्या केसांवरही होत असतो. यामुळे पावसाळ्यात केसांसंबंधीच्या विविध समस्या तोंड द्यावे लागते. कारण पावसाळ्यात हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते. यामुळे केस राठ होतात तसेच केसांची चमकही कमी होत जाते. यासह कोंडा तयार होतो. असे काही घरगुती जुगाड आहेत, जे यासारख्या समस्यांवर गुणकारी ठरतात.
केळ आणि दही
केसांच्या उत्तम आरोग्यासाठी केळ आणि दहीचे हेअर मास्क्स फार गुणकारी आहे. हे हेअर मास्क्स घरगुती बनवणे खूप सोपे आहे. दोन चमचे दह्यात पिकलेले केळ आणि एक चमचा नारळाचे तेल एकजीव करावेत. त्यानंतर तयार झालेली पेस्ट हे केसांच्या मुळांपासून लावावेत. त्यानंतर अर्ध्या तासाने केस पाण्याने धुवावेत. या पेस्टमुळे केसांची चमक वाढते. तसेच केस कोरडे होत नाहीत आणि केसांना चांगले पोषणही मिळते.
कंडीशनरचा वापर करणे
पावसाळा ऋतुत केसांची योग्य ती काळजी घेतल्यास विविध समस्यांपासून बचाव करता येऊ शकतात. पावसाच्या पाण्यामुळे केस भिजतात, अशावेळी घरी आल्यावर केसांना व्यवस्थित शॉम्पूने लावून धुवावेत. केसांसाठी हर्बल शॉम्पू वापरणे फायदेशीर राहते. केस धुतल्यानंतर एका चांगल्या कंडीशरने संथपणे केसांना मसाज करावी. यानंतर केस दोन ते तीन मिनिटांनंतर धुवावेत.
जास्वंद आणि कोरफड
जास्वंद हे केसांसाठी फार गुणकारी मानले जाते. यामुळे एका वाटीत जास्वंदाची एक ते दोन फुले घ्यावीत. त्यामुळे कोरपडीचा गर एक चमचा आणि दहीचे दोन चमचे घेऊन पेस्ट तयार करावीत. ही पेस्ट केसांना मुळापासून लावावी. यानंतर 20 मिनिटांनी केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. हे पेस्ट लावल्याने केसांना मजबूती येते. तसेच केसांची वाढही छान होते. यामुळे केसांची चमक वाढते.