महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत सुट्टी जाहीर

मुंबई, 05 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई व मुंबई उपनगरातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना उद्या 6 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातील परिपत्रक राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज जारी केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईतील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अनुयायांना महामानवाला अभिवादन करणे शक्य होणार आहे.

दरम्यान महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई परिसरात सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केली होती. यासंदर्भात वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते. त्यांच्या या मागणीची दखल राज्य सरकारने घेतली आहे. राज्य शासनाने महापरिनिर्वाण दिनी सुट्टी जाहीर केल्यामुळे वर्षा गायकवाड यांच्या या मागणीला यश आले आहे. त्याबद्दल वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

सुनेत्रा पवार बारामतीच्या भावी खासदार? मुंबईत बॅनर झळकले

“आमच्या मागणीला अनुसरून मुख्यमंत्री महोदयांनी उद्या 6 डिसेंबर 2023 रोजी भारताचे उद्‍धारक, प्रज्ञासूर्य, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई आणि उपनगरांत सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या निर्णयाचा आम्ही मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो. याबरोबरच आमच्या पाठपुराव्याला यश आले याचे समाधान आहे.” असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

दरम्यान, 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे महामानवास अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून लाखोंच्या संख्येने अनुयायी येत असतात. तसेच या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा समता आणि न्यायाचा विचार घेऊन राज्यासह मुंबईच्या अनेक भागांत विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांत देखील भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होत असतात.

विराटला आपण कर्णधार पदावरून हटवले नाही – सौरव गांगुली

One Comment on “महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत सुट्टी जाहीर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *