वरळीत हिट अँड रनची घटना, अपघातात महिलेचा मृत्यू, शिवसेना उपनेत्याला अटक

वरळी, 07 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील पोर्श कार अपघाताची अजून ताजी असताना मुंबई परिसरातील वरळी येथे हिट अँड रनची घटना घडली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये महिलेचा पती जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी पहाटे साडेपाच वाजण्याच्या घडली. दरम्यान, वरळी येथील कोळी दाम्पत्य आज पहाटे मासे आणण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी ते घरी परतत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दुर्दैवाने अपघातात या महिलेचा रुग्णालयात जागीच मृत्यू झाला.

https://x.com/ANI/status/1809867805262811188?s=19

https://x.com/ANI/status/1809872462274044357?s=19

शिवसेना उपनेत्याचा मुलगा फरार

या अपघातानंतर संशयित आरोपी फरार झाला आहे. दरम्यान, या अपघातातील बीएमडब्ल्यू कार शिवसेना पालघरचे उपनेते राजेश शहा यांच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. अपघातावेळी या बीएमडब्ल्यू कारमध्ये राजेश शहा यांचा मुलगा आणि कारचा ड्रायव्हर होता. याप्रकरणी पोलिसांनी राजेश शहा आणि कारच्या ड्रायव्हरला यांना अटक केली आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. परंतु या अपघातावेळी कारमध्ये असलेला राजेश शहा यांचा मुलगा अद्याप फरार आहे. त्याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.

पोलीस तपास सुरू

दरम्यान, हा अपघात झाला तेव्हा ही कार कोण चालवत होते? याची माहिती अद्याप समजू शकली नाही. तसेच या अपघातावेळी आरोपी दारू पिऊन गाडी चालवत होता की नाही? याचा तपास करण्याचे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे. त्यामुळे राजेश शहा यांच्या मुलाचा शोध लागणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. तर या अपघातास जो कोणी कारणीभूत असेल, त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सध्या लोकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *