न्यूयॉर्क, 06 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ते अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष असतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुमताचा 270 चा आकडा गाठला आहे. त्यांना या निवडणुकीत त्यांना 277 इलेक्टोरल मते मिळाली. तर कमला हॅरिस यांना पक्षाला 214 इलेक्टोरल मते मिळाली आहेत.
https://x.com/ANI/status/1854067151117959545?t=oiEHA-EoQlfUs-gy5K89QA&s=19
दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले
डोनाल्ड ट्रम्प हे याआधीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. त्यांनी 2016 ते 2020 या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद भूषवले होते. तेंव्हाच्या निवडणुकीत त्यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला होता. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आता पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे 130 वर्षांच्या इतिहासात प्रथमच दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आधी स्टीफन ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी अशी कामगिरी केली होती. स्टीफन क्लीव्हलँड हे 1885 ते 1889 या कालावधीतील पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. त्यानंतर त्यांनी 1893 ते 1897 या काळात दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला होता.
https://x.com/narendramodi/status/1854075308472926675?t=Y_iEtbLITXiskM0CzWpa4w&s=19
नरेंद्र मोदींचे ट्विट
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला. त्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्स वर पोस्ट शेयर करून डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले. “माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन. तुम्ही तुमच्या मागील कार्यकाळातील यशांवर आधारित आहात, मी भारत-अमेरिका व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आमच्या सहकार्याचे नूतनीकरण करण्यास उत्सुक आहे. आपण सर्वांनी मिळून आपल्या लोकांच्या भल्यासाठी एकत्रितपणे काम करूया आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीला प्रोत्साहन देऊ या.” असे पंतप्रधान मोदींनी यामध्ये म्हटले आहे.