बारामती, 21 एप्रिलः दोन वर्षांनंतर कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर बारामतीचे ग्रामदैवत हजरत पीर चाँदशाहवली बाबांचा उरूस आज गुरुवार, 21 एप्रलि पासुन सुरु होत आहे. सदर उरूस 24 एप्रिल पर्यंत होणार आहे. या बाबतची माहिती पीर चाँदशाहवली दर्गाह मज्जिद ट्रस्टच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. बारामतीत हा उरुस हिंदू-मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचे प्रतीक मानला जातो.
आज, 21 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता कुराण पठण करण्यात आले. तसेच संध्याकाळी 7.30 च्या सुमारास संदल निघाली. यात ढोल ताशांसह बँड पथक आदींचा सहभागी आहे. यंदा पुण्यातील रातीब (जरफ) मंडळाचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. रात्री 10 वाजता मानकऱ्यांच्या हस्ते संदल लेपन कार्यक्रम पार पडला. दरम्यान, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या उरूसात सहभागी होत हजरत पीर चाँदशाहवली बाबांचे दर्शन घेतले.
उद्या, 22 एप्रिल रोजी मुख्य नैवेद्याचा कार्यक्रम होणार आहे. तर 23 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 12 पर्यंत वाघ्या मुरळीचा कार्यक्रम, लेंडीपट्टी येथे दुपारी 4 वाजता कुस्त्यांचा आखाडा भरविला जाणार आहे. तर रात्री 12 वाजता दर्ग्यातून झेंडा निघून रविवारी, 24 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता पुन्हा दर्ग्यात परत येणार आहे. त्या नंतर बाबांचा भंडाऱ्याचा कार्यक्रम दुपारी 1 ते 3 पर्यंत असेल. दुपारी 4 वाजता उरूस समाप्त होणार आहे.