स्मार्टफोनचा स्फोट होण्यापासून ‘हे’ करा उपाय!!

आपल्यापैकी बहुतेक सर्वांसाठी स्मार्टफोन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. स्मार्टफोनवरून आपण घरगुती वस्तू ऑर्डर करण्यापासून, अलार्म आणि फिटनेस ट्रॅकिंगपर्यंत सर्व काही करत असतो. मात्र, मध्यंतरी स्मार्टफोनचा स्फोट झाल्याच्या अनेक बातम्या आपल्या ऐकण्यात आल्याचे आहेत. नेमकं स्मार्ट फोनमध्ये असं काय होतं की त्याचा स्फोट होतो. अशा काही पद्धती आणि सावधगिरी आहे, ज्यामुळे आपण स्मार्टफोनला क्रॅक होण्यापासून थांबवू शकतो. या काही महत्त्वाच्या टिप्स आहे, ज्याचा वापर करून स्मार्टफोन फुटणार नाही.

  • स्मार्टफोन चार्जिंगवर जास्त वेळ राहणार नाही, याची काळजी घ्यावी. रात्री फोन चार्जिंगवर लावून झोपू नका, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यात फोन बराच वेळ चार्ज केल्यानंतर स्फोट झाल्याचे समोर आलं आहे. ज्यावेळी तुम्ही तुमचा फोन चार्ज कराल, त्यावेळी काळजी घ्या आणि चार्ज झाल्यावर तो चार्जिंगमधून काढून टाका.
  • स्मार्टफोन चार्ज करताना त्यावर काम करू नका, हे नेहमी ध्यानात असू द्यात. चार्जिंग करताना गेम खेळणे आणि चित्रपट पाहणे हे टाळा, कारण चार्जिंग दरम्यान फोनचे तापमान वाढते आणि तो गरम होत असतो.
  • कंपनीने दिलेल्या चार्जरने फोन नेहमी चार्ज करणे गरजेचे आहे. स्मार्टफोन दुसर्‍या किंवा लोकल चार्जरने चार्ज करणे धोकादायक असते. त्यामुळे असे करणे शक्यतो टाळावेत.
  • काही वेळा कंपनीच्या उत्पादनातील दोषामुळे स्मार्टफोनचा स्फोट होत असतो. फोनमध्ये अनेकदा दिलेल्या लिथियम-आयन बॅटरीमध्ये बिघाड होतो. त्याममुळे फोनचा स्फोट होतात. सदोष घटक किंवा अयोग्य असेंब्लीमुळे बॅटरी खराब होण्याची शक्यता वाढते आणि स्फोट होतात. स्वस्त बॅटरीचा स्फोट होण्याची शक्यता जास्त असते, असे तज्ज्ञांकडून म्हटले जाते.
  • बॅटरीची स्थिती हे स्मार्टफोनचा स्फोट होण्यामागचे आणखी एक कारण आहे. कधी-कधी फोन खाली पडतो आणि त्यामुळे बॅटरी खराब होते. यामुळे बॅटरीची रासायनिक किंवा अंतर्गत यांत्रिक रचना बदलतात आणि यामुळे शॉर्ट सर्किट, जास्त गरम होणे यासारख्या गोष्टी होतात. त्यामुळे खराब झाल्यानंतर बॅटरी अनेक वेळा फुगते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *