दिल्ली, 30 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) यूपीएससीच्या तक्रारीवरून पूजा खेडकर यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा अर्ज भरताना पूजा खेडकर यांनी चुकीची माहिती आणि बनावट प्रमाणपत्रे दिल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पूजा खेडकर यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांत एफआयआर नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. या पार्श्वभूमीवर, पूजा खेडकर यांनी अटकपूर्व जामीनासाठी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल केली आहे.
https://x.com/ANI/status/1818211769841836528?s=19
https://x.com/ANI/status/1814220605111283747?s=19
यूपीएससीच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर
त्यांच्या या याचिकेवर 31 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीत कोर्ट पूजा खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तत्पूर्वी, पूजा खेडकर यांनी नागरी सेवा परीक्षेसाठी चुकीची माहिती आणि कागदपत्रे दिल्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) तपासणीत समोर आले होते. पूजा खेडकर यांनी त्याचे नाव, त्याच्या वडिलांचे आणि आईचे नाव, त्याचे फोटो, स्वाक्षरी, त्याचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता तसेच ओळख बदलून परीक्षा नियमांनुसार परवानगी असलेल्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केल्याचे या तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात केंद्रीय लोकसेवा आयोगाने काही दिवसांपूर्वी पूजा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच याप्रकरणी त्यांनी पूजा खेडकर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात एफआयआरची नोंद केली होती.
चौकशीसाठी केंद्रीय समिती स्थापन
तत्पूर्वी, पूजा खेडकर यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी बनावट अपंगत्व आणि नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रे सादर केल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. पूजा खेडकर आणि त्यांच्या वडिलांकडे कोट्यवधींची संपत्ती असून देखील त्यांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कसे काय सादर केले? असा प्रश्न त्यानिमित्ताने सर्वत्र विचारला जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने एक सदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती 2 आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे या अहवालातून कोणती माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.