मुंबई, 8 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अशातच ओबीसी आरक्षणाला विरोध करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. बाळासाहेब सराटे, शिवाजी कवठेकर आणि प्रशांत भोसले या मराठा समाजाच्या वकिलांनी ही याचिका दाखल केली आहे. “ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश रद्द करण्यात यावा तसेच ओबीसी आरक्षणाचे पुन्हा सर्वेक्षण करा.” अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. ओबीसी समाजाला हे आरक्षण चुकीच्या पद्धतीने दिलेले आहे. तसेच प्रत्येक 10 वर्षांनी कोणत्याही आरक्षणाचे सर्वेक्षण केले पाहिजे. त्यामुळे हे ओबीसी आरक्षण घटनाबाह्य असून या आरक्षणाला फेरसर्वेक्षण करेपर्यंत स्थगिती देण्यात यावी, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. तर याप्रकरणात कोर्ट काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या सुनावणीला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी ओबीसी आरक्षणाच्या बाजूने छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याला विरोध केला आहे. तसेच ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. ओबीसीमध्ये आधीच खूप जाती आहेत. अशात मराठा समाज ओबीसीमध्ये आला तर, त्यामुळे सर्वांचेच नुकसान होणार आहे. असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.
बलात्कार घटनेच्या निषेधार्थात जय मल्हार क्रांती संघटनेचा मोर्चा
दरम्यान राज्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन नुकतेच शांत झाले. यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने करण्यात आली होती. यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले. मात्र सरकारच्या शिष्टमंडळाने मध्यस्ती केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे हे उपोषण 2 नोव्हेंबर रोजी मागे घेतले होते. यावेळी जरांगे पाटलांनी महाराष्ट्र सरकारला मराठा आरक्षण लागू करण्यासाठी 2 जानेवारी 2024 पर्यंत अल्टिमेटम दिला आहे.
राज्यात अवकाळी पाऊस; पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
One Comment on “ओबीसी आरक्षणाच्या याचिकेवर आज सुनावणी”