बारामती, 13 ऑक्टोबरः बारामती शहर व तालुका परिसरात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून वातावरणातील बदलाने मानवी शरीरावर विविध परिणाम होत आहे. त्यामुळे थंडी, ताप, खोकला, वायरल, डोळ्यांचा त्रास आदी विविध आजाराने बारामतीकर त्रस्त आहे. यातच विकसित बारामतीमध्ये जिल्हा परिषद व महाराष्ट्र राज्य संचलित रुग्णालय अपुऱ्या मनुष्यबळ व यंत्रणेमुळे लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यात अयशस्वी ठरत आहे.
बारामतीच्या जनावरे बाजारात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली!
अनेक वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कामाच्या ठिकाणी राहत नाहीत, त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. खासगी डॉक्टरांशी असलेले वैयक्तिक संबंध व त्यातून निर्माण होणारे अर्थाजन त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे पाठवण्याचा कल आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने दैनंदिन आजारासाठी उपचार करण्यास शासकीय कर्मचारी व अधिकारी कर्तव्य बजावण्यास असमर्थता दर्शवत आहेत.
प्रमुख तीन रुग्णालयांमध्ये नियमित अस्वच्छता, कर्मचाऱ्यांच्या अभावांमुळे रुग्णांची होणारी हेळसांड, अनेक विभाग बंदावस्थेत आहेत. यामुळे प्रकृती बिघडलेल्या रुग्णांना एकतर पुण्यातील सुसन रुग्णालयात पाठवावे लागते, किंवा खासगी रुग्णालयात वर्ग करावे लागते. यातूनच विशिष्ट रुग्णालयात रुग्णांना नेण्याचा आग्रह शासकीय वैद्यकीय अधिकार व कर्मचारी धरत असतात. याची गमक रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना कळत नाही.
कोरोना काळात उभे केलेले सर्व अत्याधुनिक शासकीय व खासगी यंत्रणा लोकसमुहातून व वर्गणीतून रुग्णांसाठी उभा केलेले आणि मुलभूत आरोग्य पायाभूत सुविधा कुठं गेल्या? आज शासकीय रुग्णालयात तीन ते चार आयसीयू रुग्ण राहतील ऐवढी क्षमता बारामती तालुक्याच्या शासकीय रुग्णालयात आहेत. ऐवढ्या मोठ्या विकसित बारामतीमध्ये जी बारामती रुग्ण व वैद्यकीय सेवा केंद्र होत आहे, अशा केंद्रात सर्वसामान्य रुग्णांना मापक दरात किंवा मोफत सेवा देणाऱ्या शासकीय यंत्रणा अंतिम श्वास घेत आहेत.
तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ!
कोरोना काळात शासनाने व दानशुर लोकांनी, स्वयंसेवी संघटनांनी दान केलेली आरोग्य यंत्र सामृग्री (व्हेण्टिलेटर, ऑक्सिजन यंत्रणा, बेड, आदी) कुठं गेली आहेत? याचा उपयोग कुठल्या रुग्णांसाठी केला जात आहे? याची चौकशी करण्याची वेळ येऊ ठेपली आहे. त्यामुळे व्हेण्टिलेटरवर असलेली आरोग्य व्यवस्था केव्हा शेवटची घटका मोजेल व रुग्णांना यम लोकी पाठवेल, हे सांगता येत नाही.
2 Comments on “बारामती तालुक्यातील आरोग्य व्यवस्था व्हेण्टिलेटरवर!”